औरंगाबादमध्ये एकही दारूचं दुकान उघडू देणार नाही- खासदार इम्तियाज जलील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । ”जर औरंगाबादमधील दारूची दुकानं खुली झाली तर, आम्ही ती दुकानं बंद पाडण्यास भाग पाडू” असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारनं रेड झोनमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून दारूची दुकान सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं तळीरामांकडून स्वागत होत असलं तरी, काही ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. औरंगाबादमधील खासदार इम्तियाज जलील यांनीही मद्यविक्रीची दुकानं खुली करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

जर औरंगाबादमधील दारूची दुकानं खुली झाली तर, आम्ही ती दुकानं बंद पाडण्यास भाग पाडू. सर्व महिला वर्गाला घेऊन रस्त्यावर उतरू असा कडक इशारा देत दारुची दुकानं खुली करण्याची ही योग्य वेळ नाही, असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. दारू विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर खासदार जलील यांनी ट्विटरवर टीका केली आहे. या संकटकाळात या सरकारला मद्यविक्रीची काय घाई झाली आहे, असा सवाल त्यांनी केला. सरकारनं सर्व गोष्टी विकण्याची परवानगी का दिली नाही. केवळ मद्यविक्रीस परवानगी का दिली? अशी विचारणाही त्यांनी सरकारला केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment