RCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक

RCB Team
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळणाऱ्या डॅनियल सॅम्सने मानसिक तणावाचे कारण देत क्रिकेटमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपली निवड करण्यात येऊ नये, असे डॅनियल सॅम्सने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले होते. यानंतर त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. सॅम्सने बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे मानसिक तणावात गेल्याचे सांगितले आहे. यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. आयपीएल सुरू होण्याअगोदर डॅनियल सॅम्सला कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे तो भारतातच क्वारंटाईन झाला होता. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर सॅम्स आरसीबीच्या संघात दाखल झाला होता.

मानसिक तणावामुळे डॅनियल सॅम्सने वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जायचा निर्णय घेतला आहे.डॅनियल सॅम्सच्या अगोदर ग्लेन मॅक्सवेल, विल पुकोवस्की आणि निक मॅडिन्सन यांनीदेखील मानसिक तणावामुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. ऑस्ट्रेलियाची टीम जुलै मध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये ते 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहेत. 9,10,12,14 आणि 16 जुलै रोजी टी-20ची सिरीज खेळणार आहेत. तर 20 जुलै, 22 जुलै आणि 24 जुलैला वनडे मॅचची सिरीज खेळणार आहेत.

ऑस्ट्रेलियाची टीम
एरॉन फिंच (कर्णधार), एलेक्स कॅरी, स्टीव स्मिथ, एश्टन एगर, जेसन बेहरडॉर्फ, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेजलवूड, मोइसेस हेनरिक्स, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिले मेरिडिथ, जॉश फिलीपी, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, तनवीर संघा, डार्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, स्वेपसन, एंड्रयू टाय, मॅथ्यू वेड, एडम झम्पा