हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank कडून आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. हे 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्सवर असेल. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या नुसार, 11 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू होणार आहेत. यानंतर, बँकेच्या 17 महिने आणि 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
इथे हे लक्षात घ्या कि, Axis Bank ने फक्त या मुदतीच्याच FD वरील व्याजदरात बदल केला आहे. तसेच इतर सर्व मुदतीच्या FD वर आधीच्याच दराने म्हणजेच जुन्या दराने व्याज मिळेल. बँके कडून 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीची ऑफर दिली जाते. त्याच वेळी, त्यावर 2.50 टक्के ते 5.75 टक्के व्याज दिले जात आहे. RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात सुरुवात केली आहे. चला तर मग Axis Bank आपल्या FD वर किती व्याजदर देत आहेत ते पाहूया…
असे असतील FD वरील नवीन व्याजदर
Axis Bank कडून 7 दिवस ते 29 दिवस कालावधीच्या FD वर 2.50% व्याजदर मिळत राहील. तसेच बँक 30 दिवस ते 3 महिन्यांच्या FD वर 3.00% व्याजदर देत राहील. Axis Bank 3 महिने ते 6 महिन्यांच्या FD वर 4.65% व्याजदर देत राहील. त्याच बरोबर 7 ते 8 महिन्यांच्या FD वर 4.40% व्याजदर मिळेल. तसेच बँक 9 महिन्यांच्या FD वर 4.65% व्याजदर देईल. त्याच वेळी, 9 महिन्यांपेक्षा जास्त आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर बँकेकडून 4.75% व्याजदर दिला जाईल.
त्याच बरोबर 1 वर्ष ते 1 वर्ष 11 दिवसांच्या FD वर 5.45% व्याजदर दिला जाईल. तसेच 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसांच्या FD वर बँक 5.75 व्याजदर देईल. Axis Bank 1 वर्ष 25 दिवस ते 17 महिन्यांच्या FD वर 5.60% व्याजदर देईल. बँकेने 17 महिन्यांपासून ते 18 महिन्यांच्या FD वरील व्याजदर 5.60% वरून 6.05% पर्यंत वाढवला आहे.
कोणत्या कालावधीसाठी जुने दर राहतील
Axis Bank 18 महिने ते 2 वर्षांच्या FD वर 5.60% व्याजदर देत राहील. तर 2 ते 5 वर्षांच्या मुदतीच्या FD वर बँक 5.70% आणि 5 वर्ष ते 10 वर्षांच्या FD वर 5.75% व्याजदर देत राहील.
SBI ने देखील एफडीवरील व्याजदरातही केली वाढ
SBI ने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहिती नुसार,13 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. SBI आता 7 दिवस ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर सामान्य लोकांसाठी 2.90% ते 5.65% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.40% ते 6.45% व्याज दर देत आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits
हे पण वाचा :
मोबाईल कॅमेरा शक्यतो डाव्या बाजूलाच का असतो?? ‘हे’ आहे कारण
Axis Bank कडून FD व्याजदरात बदल; पहा आता किती रिटर्न मिळणार
PM Awas Yojana चा कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला !!! कोणा-कोणाला करता येईल अर्ज ते पहा
Multibagger Stock : गेल्या 21 वर्षात ‘या’ शेअर्सद्वारे गुंतवणूकदारांनी मिळवले कोट्यवधी रुपये !!!