Axis Bank कडून ग्राहकांना धक्का, आता बँकेकडून कर्ज घेणे महागले

Axis Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये Axis Bank चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत बँकेने वेगवेगळ्या कालावधीतील MCLR मध्ये 0.30 टक्क्यांनी वाढ केली आहे. ज्यानंतर आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. 17 डिसेंबर 2022 पासून बँकेचे नवीन दर लागू झाले आहेत.

Axis Bank hikes MCLR rates by 25 bps across tenors | Mint

एका नोटीसनुसार, बँकेने एक वर्षाच्या MCLR मध्ये 0.30 टक्क्यांनी वाढ करून 8.75 टक्के केला आहे. यानंतर 2-वर्ष आणि 3-वर्षांचा MCLR आता अनुक्रमे 8.55 टक्के आणि 8.60 टक्के झाला आहे. तसेच तीन महिन्यांचा MCLR 0.30 टक्क्यांनी वाढवून 8.65 टक्के, 6 महिन्यांचा MCLR 8.70 टक्के आणि एक दिवसाचा MCLR 8.55 टक्के करण्यात आला आहे. Axis Bank

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.

Axis Bank plans organisational recast, synergy with subsidiaries | Business  Standard News

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Axis Bank

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

RBI ने रेपो दरात केली वाढ

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Axis Bank

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/docs/default-source/default-document-library/axis-bank-mclr-website-18-jun-2022.pdf

हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ स्मॉल-कॅप कंपनीच्या शेअर्सने 1 वर्षात दिला 200% रिटर्न
Sovereign Gold Bond : आजपासून स्वस्त दरात सोने खरेदीची संधी, कसे ते जाणून घ्या
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 252 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या आज झाले बदल, नवीन दर तपासा
OnePlus 10 Pro 5G फोनवर मिळत आहे 10,000 रुपयांची सूट, जाणून घ्या फायदा कसा घ्यावा