Axis Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली पुन्हा वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : 8 फेब्रुवारी रोजी RBI ने आपल्या त्रेमासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात येऊ लागली आहे. यादरम्यान आता खासगी क्षेत्रातील Axis Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत वेगवेगळ्या कालावधीच्या MCLR मध्ये 10 बेस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे. यानंतर आता या बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. तसेच बँकेचे हे नवीन दर 19 फेब्रुवारी 2022 पासून लागू झाले आहेत. हे जाणून घ्या कि, जानेवारीच्या सुरुवातीलाही या बँकेने आपल्या सर्व कालावधीसाठीच्या MCLR मध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केली होती.

Axis Bank hikes MCLR rates by 25 bps across tenors | Mint

Axis Bank च्या MCLR चे नवीन दर

आता Axis Bank चा ओव्हरनाईट MCLR रेट 8.70%, 1 महिन्यासाठीचा MCLR रेट 8.70% आणि 3 महिन्यांसाठीचा MCLR रेट 8.80% झाला आहे. तसेच बँकेने 6 महिन्यांसाठीच्या MCLR मध्ये 10 बेस पॉंईटसनी वाढ करून 8.85 टक्के, 1 वर्षासाठीच्या MCLR मध्ये 8.80 टक्क्यांवरून 8.90 टक्के, 2 वर्षांसाठीच्या MCLR मध्ये 8.90 टक्क्यांवरून 9.00 टक्के आणि 3 वर्षांसाठीच्या MCLR मध्ये 8.95 टक्क्यांवरून 8.05 टक्के वाढवला आहे.

Axis Bank Hikes MCLR Rates Today, Home Loan, Car Loan EMIs to Increase; Check Here

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.axisbank.com/docs/default-source/default-document-library/axis-bank-mclr-website-18-october-2022.pdf

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे