राम मंदिर भुमिपूजनाच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरेंचा अपमान केला जातोय- काँग्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अयोध्या राम मंदिर भुमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न पाठवण्यावरून वाद सुरू झालाय. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मंदिर कमिटीला पत्र देखील लिहिले. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांच्या बचावासाठी काँग्रेस धावून आली आहे. उद्धव ठाकरेंचा अपमान केला जात असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी व्यक्त केलं आहे.

उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमीपूजन निमंत्रण द्यायला पाहीजे. निमंत्रण देण्यावरून भाजपचं राजकारण सुरु असल्याची टीका दलवाई यांनी केलीयं. कोरोना काळात भूमीपूजन केलं जातंय. मग सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल का? राम मंदिर बांधायला विरोध नाही पण त्यामुळे दंगली थांबणार आहे का ? रामराज्य येणार आहे का? याची उत्तर मोदींनी द्यावी असेही ते म्हणाले.

येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कोरोनाच्या संकटकाळात राममंदिराचे भूमिपूजन इतके महत्त्वाचे आहे का, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment