नवी दिल्ली । कोरोनाच्या दुसर्या लाटेचा परिणाम संपूर्ण देशाला झाला आहे. अशा परिस्थितीत विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी (Azim Premji) हे सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होऊ लागले आहेत. यामागचे कारण म्हणजे त्यांनी दिलेली मोठी देणगी. ही देणगी गेल्या वर्षी देण्यात आली आहे.
कोरोना कालावधीत कोणी दान केले तर त्याचे कौतुक केले पाहिजे आणि ट्विटरवर हे होत आहे. अजीम प्रेमजींच्या देणगीबद्दल लोकं त्याचं कौतुक करत आहेत. हारून रिपोर्ट इंडिया आणि एडेलगिव फाऊंडेशनच्या अहवालात देणगीच्या बाबतीत त्यांनी या लिस्ट मध्ये अव्वल स्थान गाठले आहे. आता ट्विटरवरही याच देणगीचे कौतुक केले जात आहे.
अजीम प्रेमजी यांनी गेल्या वर्षी 7,904 कोटी रुपयांची देणगी दिली
आज ट्विटरवर कौतुक होत असलेल्या अझीम प्रेमजी यांची देणगी प्रत्यक्षात 2019-20 ची आहे. 2019-20 मध्ये त्यांनी दररोज सुमारे 22 कोटी रुपये दान म्हणून दिले म्हणजेच एकूण 7,904 कोटी रुपये. हारून रिपोर्ट इंडिया आणि एडेलगिव फाऊंडेशनच्या अहवालात देणगीच्या बाबतीत त्यांनी या लिस्ट मध्ये अव्वल स्थान गाठले आहे.
जुन्या प्रकरणात प्रेमजी का ट्रेंड झाले ?
आम आदमी पार्टी सोडून गेलेले आशिष खेतान यांनी 2019-20 च्या त्या देणगीबद्दल ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की,”कोरोना साथीच्या विरोधात लढण्यासाठी अझीम प्रेमजींनी दररोज 22 कोटी रुपये दिले.” यासाठी त्यांनी अझीम प्रेमजी आणि त्यांची कंपनी विप्रो यांचे कौतुक केले. तेव्हापासून अझीम प्रेमजी ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा