सोलापूर | “पंढरीची वारी आहे माझे घरी, वारी चुको न दे हरी” असं अभिमानाने सांगणारा महाराष्ट्रातला बहुसंख्य वारकरी, माळकरी वर्ग आहे. पण यंदा मात्र कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आषाढवारी रद्द करण्यात आली होती. नंतर त्यापुढची माघीवारी देखील रद्द करण्यात आलं आहे. म्हणून बा विठ्ठला ! तुझ्या वारीसाठी अजून किती दिवस तिष्ठत ठेवशील आम्हाला अशी भावना वारकर्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनामुळे पंढरपूर शहरासह १० गावांमध्ये संचारबंदी देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर शहरासह शेजारच्या दहा गावांमध्ये संचारबंदीचे आदेश देण्यात आलेत. २२ फेब्रुवारी मध्यरात्रीपासून २३ फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या संदर्भात नुकतेच आदेश काढले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी माघी यात्रेच्या दिवशी पंढरपुरात एक दिवसाची संचार बंदी लागू केली आहे. 23 फेब्रुवारी रोजी माघी यात्रा आहे. दरम्यान राज्यभरात पुन्हा कोरोना चा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने माघी यात्रा रद्द केली आहे.
माघी एकादशीच्या दिवशी पंढरपूर शहरासह जवळच्या वाखरी, टाकळी, इसबावी, कौठाळी, गोपाळपूर, शेगाव दुमाला, शिरढोण, गादेगाव, चिंचोली भोसे, भटुंबरे,आढीव, देगाव या गावात 22 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही संचार बंदी लागू केली आहे.
दरम्यान शहर व परिसरातील मठामध्ये वारकर्यांना राहण्यास मज्जाव देखील करण्यात आला आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लेखी आदेश दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर समितीने 22 व 23 फेब्रुवारी रोजी भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्यण घेतला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व परिसरातील 12 गावांमध्ये संचार बंदी आदेश लागू केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.