चंद्रकांत पाटील काहीही बरळतात मला त्यांची कीव करावीशी वाटते : विकास लवांडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच पुण्यात “युवा वरियर्स” या कार्यक्रमांत बोलतांना ” ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती केले असल्याची दर्पोक्ती केली. चंद्रकांत पाटील यांचे हे वक्तव्य सध्या समाज माध्यमांवर चांगलेच ट्रोल होतं आहे. यावर अनेक उलट – सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

चंद्रकांत पाटलांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी देखील टीका केली आहे. लवांडे हे “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना म्हणाले की ” भाजपचे बरेच प्रमुख नेते वरचेवर वस्तुस्थितीच्या विपरीत बोलत असतात. त्याला काही एवढं महत्व देण्याचं कारण नाही. पण सरकार विरोधी कुणीही सनदशीर आंदोलन केले किंवा काही भाष्य केले तर त्यांना भाजपकडून देशद्रोही ठरवलं जात आहे.हे कुठेतरी चुकीचं आहे.तसेच युवा वारीयर्स अभियान हे युवा वर्गाची माथी भडकवून हिंदुत्ववादी बनवण्याचा नवा प्रयत्न आहे. RSS चे भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्रबांधणीसाठी काहीही योगदान नसून उलट तेच हिंदुत्ववादी धर्मांध भूमिका घेत अडथळा बनून कार्यरत आहेत.
युवा वर्गाला आपले विचार समजावून देऊ शकलो नाही किंवा पटवून देऊ शकलो नाही तर त्यांचा बुद्धिभेद करायचा ही नीती अनेक वर्षांपासून सुरू आहे. देशाचा खरा इतिहास सतत झाकायचा त्यांचा प्रयत्न असतो.

आदरणीय ए. पी.जे.अब्दुल कलाम हे व्यक्तिमत्व धर्मनिरपेक्ष विचारांचे होते.संविधानिक मूल्यांची जोपासना करणारे आदर्श व्यक्तिमत्व होते.ते राष्ट्रपती पदावर जाण्यासाठी कुणी पाठींबा दिला होता हे जगजाहिर असताना, चंद्रकांत पाटील जेव्हा नेहमीप्रमाणे काहीही बरळतात तेव्हा त्यांची कीव करावी वाटते.परंतु देशातील अभ्यासू युवा वर्ग आता यांच्या भूलथापा ओळखू लागला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना अजिबात गांभिर्याने घेऊ नका. असं लवांडे यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment