हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिपब्लिकन पक्षाच्या आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदावर असणाऱ्या रामदास आठवले यांनी सोमवारी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदूमिल इथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कामाच्या आढाव्याची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आज सर्वांशी चर्चा केली. या स्मारकाचा चौथरा चीन मध्ये बनविले जाणार होते. हा निर्णय रद्द करावा आणि हा पुतळा भारतात अर्थात मेड इन इंडिया असावा अशी मागणी आठवलेंनी केली आहे. सध्या चीनमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात सुरु असून अशा परिस्थितीत तिथे पुतळा बनविणे योग्य नाही असे आठवले म्हणाले.
भारतात हा पुतळा बनविण्यासाठी भारतातील ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांची तयारी असल्याचे सांगत त्यामुळे भारतातील अनेकांना रोजगार मिळेल असे त्यांनी सांगितले. इंदुमिल आणि चैत्यभूमीच्या दरम्यान समुद्राजवळून रस्ता तयार केला जाणं महत्त्वाचं असल्याचं सांगत त्यासाठी लागणारी सीआरझेडची पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळवून देण्यास आपण पुढाकार घेणार असल्याचा विश्वास आठवले यांनी दिला. या स्मारकातील नियोजित विविध सभागृहांच्या कामांपैकी ७०% काम पूर्ण झाले असल्याचे आणि स्मारकाच्या फाउंडेशनचे काम १००% पूर्ण झाले आहे, तसेच बेसमेंटचे ७२% काम पूर्ण झाले असून स्मारकाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. अशी माहिती शापूरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापक उमेश साळुंखे यांनी दिली.
या स्मारकाच्या कामासाठी जवळपास ३ वर्षे कालावधी लागणार असून सध्या संचारबंदीमध्ये हे काम दोन महिने थांबविण्यात आले आहे. स्मारकाच्या कामासाठी १ हजार ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या कामगारांची कमतरता आहे मात्र युद्धपातळीवर काम सुरु आहे अशी माहिती मिळाली आहे. याबरोबर “दरवर्षी पावसाळयाच्या दिवसांमध्ये चैत्यभूमीच्या स्तूपाला हानी पोहोचते, म्हणूनच चैत्यभूमीसारखा भव्य स्तूप उभारण्यात यावा” अशी विचारणा त्यांनी केली आहे. तसेचशिवाय चैत्यभूमीपाशी समुद्राच्या दिशेने रस्ता वाढवण्यासाठी सध्या उभारण्यात आलेली भिंत वाढवावी अशी सूचनाही त्यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.