हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले प्रहार संघटनेचे नेते तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. शिंदे यांच्याबरोबर शिवसेना व प्रहारचे असे मिळून 35 आमदार आहेत. आत काँग्रेसची बारी आहे. त्यामुळे त्यांच्यातीलही कहाणी आमदार येतील, असे कडू यांनी म्हंटले आहे.
आमदार बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी येथे दाखल झाले. यावेळी त्यांनाही माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमच्यासोबत शिवसेनेचे ३३ आमदार आहेत आणि काही अपक्षही आहेत. आज आणखी काही आमदार दाखल होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा आकडा ३८ -३९ पर्यंत जाईल. एकूण आमदारांची संख्या ५० पर्यंत नक्कीच जाईल. काँग्रेसचेही काही आमदार सोबत येणार. दोन तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल,असा दावा कडू यांनी यावेळी केला.
वास्तविक पाहता आम्ही शिवसेनेला समर्पित होतो. शिवसेनेचे ७५ टक्के आमदार आल्याने आम्हीही या ठिकाणी आलो. शिवसेनेशी आमची कोणतीही व्यक्तिगत नाराजी नाही. निधीतली विषमता आहे, शिवसेनेने त्याकडे लक्ष दिलेले नाही. असे कारण बच्चू कडू यांनी सांगितलं. मी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांना सांगितलं की दोन्ही निवडणुकांमध्ये आम्ही सेनेलाच मत दिले मग हे अचानक वातावरण तयार झाले आणि परिस्थिती बदलली. शिंदेसोबत असलेले सर्व आमदार खुश आहेत, असे कडू यांनी म्हंटले.