Thursday, February 2, 2023

बच्चू कडू माझ्या कॉलमुळेच गुवाहाटीला गेले; फडणवीसांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यावरून दोघांत शाब्दिक युद्धही रंगलं होत. मात्र बच्चू कडू हे माझ्या एक फोन कॉल मुळेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

बच्चू कडू यांना मी स्वतः फोन केला होता. मी त्यांना सांगितलं की आम्हांला सरकार बनवायचं आहे. तुम्ही आमच्या सोबत हवे आहात. तुम्ही आमच्या ग्रुपवर यावं असं मी त्यांना सांगितलं आणि बच्चू कडू गुवाहाटीला गेले असं असा मोठा खुलासा फडणवीसांनी केला. बच्चू कडू यांनी कोणाशी सौदा केला हे म्हणनच चुकीचं आहे. बाकीचे कोणी माझ्या फोनवर गेले नाहीत पण बच्चू कडू मात्र माझ्या फोनमुळेच गुवाहाटीला गेले असं फडणवीसांनी सांगितलं .

गुवाहाटीला जे जे आमदार गेले ते पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन गेले. संख्याबळ जमलं नाही तर आपलं पद जाऊ शकत याची त्यांना कल्पना होती मात्र तरीही शिंदेंवर विश्वास ठेऊन ते गेले. म्हणून आम्ही काल बच्चू कडू आणि रवी राणा याना एकत्र बसवून हा विषय संपवला आहे. रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आणि बच्चू कडू यांनीही ते मान्य केलं आहे असं फडणवीस म्हणाले.