बोगस कागदत्रे सादर करून मिळवला जामीन, वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करून जालना जिल्ह्यातील जामिनदाराने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजी लाला चव्हाण (रा. खांबेवाडी, ता. जि. जालना) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी शिवाजी चव्हाण याच्याविरुद्ध गेल्या वषीर्पासून खटला सुरू आहे. या खटल्यातून जामीन मिळविण्यासाठी शिवाजी चव्हाण याने छबू नामदेव चव्हाण यांचा जामीन देताना तलाठी सज्जा खांबेवाडी, तहसील कार्यालय जालना यांच्या बनावट स्वाक्षरी, शिक्क्यांचा वापर केला. त्याआधारे बनवलेले ऐपत प्रमाणपत्र न्यायालयाला सादर केले. या बनावट कागदपत्रांआधारे शिवाजी चव्हाण याने छबू चव्हाण याचा जामीन मिळवला.

हा प्रकार निदर्शनास आल्यावरून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधीक्षक उषा रखमाजी हिरे (५६) यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक राहुल भदरगे करत आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment