राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी

0
101
raj thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत केलेल्या आदेशानंतर व वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात काल उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर आता राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

बाळा नांदगावकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरेंना धमकी देण्यात आली असून तशा प्रकारचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे. या धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आला आहे. या धमकीच्या पत्राची राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी नांदगावकरांनी केली.

दरम्यान राज ठाकरे यांना धमकीचे पत्र मिळाल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंचीही भेट घेतली. या धमकीच्या पत्रानंतर राज ठाकरे याची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे.

काय लिहले आहे पत्रात?

राज ठाकरे यांना ज्या पत्राद्वारे धमकी देण्यात आलेली आहे त्या पत्राबाबत सांगताना नांदगावकर म्हणाले की, “अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू,” असे पत्रात लिहिले असल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत असेही त्यांनी सांगितले.

राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर… : बाळा नांदगावकर

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महाविकास आघाडी सरकारला थेट इशाराच दिला. यावेळी ते म्हणाले की, पत्र कोणी दिले आहे याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आले आहे. गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. आता ह्मविकास आघाडीला माझा थेट इशारा आहे. राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी, असे नांदगावकर यांनी म्हंटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here