हॅलो महाराष्ट्र । महाराष्ट्र विधानसभेच्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबतीने महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन केलं. मागील ३ महिन्यांच्या कालावधीत बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आणि जयंतीदिन अनुभवण्याची संधी ठाकरे कुटुंबियांसहित संपूर्ण महाराष्ट्राला मिळाली. बाळासाहेब ठाकरेंना जाऊन ८ वर्षं झाली तरी त्यांच्या नावाचा दरारा महाराष्ट्रात अजूनही आहे. याच पावलावर पाऊल ठेवत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा समर्थपणे पेलायला सुरुवात केली. या प्रवासात त्यांचे चिरंजीव आणि बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे हेसुद्धा आघाडीवर असल्याचं दिसून आलं.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी आपले पुत्र अमित ठाकरे यांचं लॉंचिंग केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या नवीन प्रवासासाठी तयार झाली आहे. याच दिवशी उद्धव ठाकरे यांचा भव्य नागरी सत्कार मुंबईतील वांद्रे येथे आयोजित केला असून यानिमित्ताने शिवसेनाही शक्तीप्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बाळासाहेब ठाकरेंच्या कुशीत बसलेला आपला फोटो शेअर केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे, पवार, तटकरे, शिंदे, मुंडे, क्षीरसागर अशी घराणी सक्रिय असताना ठाकरेंच्या घराण्यातून सक्रिय राजकारणात एण्ट्री केलेल्या अमित आणि आदित्य ठाकरे या दोघांपैकी कोण सरस ठरणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
जेव्हा ‘उद्धव’ रोहित पवार यांच्या हातून चप्पल घालतात..
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा; मनसे हिंदुत्वाच्या वाटेवर..