दुबई : वृत्तसंस्था – नुकतीच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यामालिकेत पहिल्या दोन सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता तर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला. यामुळे बांगलादेशने हि मालिका २-१ने जिंकली होती. अखेरच्या लढतीत बांगलादेशकडून पुन्हा एकदा जंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाला काळिमा लागला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप सुपर लीग सीरिजमधील अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार तमीम इकबाल याला अभद्र भाषा वापरल्याबद्दल ICCकडून दंड आकारण्यात आला आहे. आयसीसीने त्याला मॅच फीच्या १५ टक्के म्हणजेच ४५ हजार रुपये इतका दंड आकारला आहे.
आयसीसीने आचार संहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी इकबालला दोषी ठरवण्यात आले आहे. या शिवाय त्याला एक नकारात्मक गुण देखील देण्यात आला. मागच्या २४ महिन्यांच्या कालावधीमधील त्याची हि पहिलीच चूक आहे. अखेरच्या लढतीत बांगलादेशच्या डावामधील १०व्या षटकात तमीमने विकेटच्या मागे कॅच घेतला होता. तेव्हा त्यांनी रिव्ह्यू घेतला होता तेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागला नाही. यानंतर इकबालने अभ्रद्र भाषेचा वापर केला होता. सामनाधिकारी नेयामुर राशिद यांनी इकबालला शिक्षा सुनावली, तेव्हा त्याने आपली चूक मान्य केली आहे. यामुळे या प्रकरणावर औपचारिक सुनावणी करण्यात आली नाही.
बांगलादेशच्या खेळाडूंकडून या मालिकेत झालेली ही पहिली चूक नाही आहे. या अगोदरच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विकेटकीपर आणि फलंदाज मुशफिकुल रहीमने गोलंदाज मेहदी हसन मिराजला नॉन स्ट्रायकल बाजूकडील फलंदाज तुझ्या मधे आले तर त्याला धक्का देऊन जमीनीवर पाड असा सल्ला दिला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता.