हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सामान्य माणसाच्या खिशावर एक नवा ताण पडणार आहे. आता बँकेतून पैसे काढणे महागात पडणार आहे. कारण आता आपलेच पैसे काढण्यासाठी चार्ज द्यावा लागणार आहे. काही बँकांनी आता याची सुरुवात केली आहे. १ ऑगस्ट पासून ही योजना सुरु होणार आहे. तर काही बँकांनी खात्यातील बॅलन्सची रक्कम वाढविण्यात आली आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, ऍक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँक यांचा समावेश आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या मेट्रो तसेच शहरी भागातील खातेधारकांसाठी कमीतकमी २००० रुपये बॅलन्स ठेवण्यात सांगण्यात आले आहे. अगोदर याची मर्यादा १,५०० रुपये होती. २०००रु न ठेवण्याचा दंड भरावा लागणार आहे. मेट्रो तसेच शहरी भागात ७५ रु, निमशहरी शाखेत ५०रु, ग्रामीण भागात २०रु दंड भरावा लागणार आहे. करंट खातेधारकांसाठी ५०००रु दरमहा बॅलन्स रक्कम करण्यात आली आहे.
एटीएम प्रमाणेच आपली होम ब्रांच अथवा इतर शाखेतून महिन्यातून ३ वेळा मोफत पैसे देवाणघेवाण करता येईल. यावर १०० रु भरावे लागतील. लॉकर साथीचे डिपॉझिट कमी करण्यात आले आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे एमडी आणि सीईओ राजीव यांनी कोरोना काळात बँकिंग क्षेत्रात महत्वपूर्ण बदल झाल्याचे सांगितले. बँकेतील लोकांचा संपर्क कमी करण्यासाठी तथा डिजिटल बँकिंग वाढविण्यासाठी चार्जेस मध्ये बदल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
हे पण वाचा –
सावधान ! जर आपल्याकडे असतील एकापेक्षा जास्त बँकांमध्ये Saving Account तर होऊ शकेल ‘हे’ मोठे नुकसान
केंद्र सरकारने लॉन्च केली जगातील सर्वात स्वस्त Corona Testing Kit, आता किती रुपये लागतील जाणून घ्या
SBI, ICICI आणि HDFC बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली आहे एक खास FD योजना, जाणून घ्या