ऑनलाईन जनरेट करा SBI चा ATM पिन, सोपी आहे पद्धत; जाणून घ्या 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसबीआय ने आता खातेधारकांसाठी स्वतःच एटीएम पिन जनरेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन अर्थातच इंटरनेटच्या माध्यमातूनही आता पिन जनरेट करता येणार आहे तसेच बदलता देखील येणार आहे. यासाठी केवळ आपला मोबाईल नंबर रजिस्टर असावा लागतो. इंटरनेट बँकिंग सुरु असावी लागते. घरी बसून पिन कसा जनरेट करायचा ते जाणून घेऊया.

onlinesbi.com वर जाऊन युजरनेम आणि पासवर्ड देऊन लॉग इन व्हायचे. वरती इ सर्व्हिस च्या पर्यायावर जाऊन एटीएम कार्ड हा पर्याय निवडायचा. नवीन पेजवरील चार पर्यायांपैकी एटीएम पिन जनरेशन पर्याय वर जायचे. त्यावर दोन पर्याय येतील ओटीपी द्वारे अथवा प्रोफाईल पासवर्ड द्वारे पिन जनरेट करा. एक पर्याय निवडून पुढे जायचे. इथे एंटर करून सबमिट करायचे. आता एसबीआय अकॉउंट समोर येतील त्यातील आपले अकॉउंट निवडून पिन जनरेट करणे अथवा बदलणे हा पर्याय निवडायचा.

आता सर्व कार्ड दिसतील त्यातील आपले कार्ड निवडायचे. नंतर नवीन पिन जनरेट करण्याचा पर्याय निवडून दोन अंक भरून सबमिट करायचे. पुढचे दोन अंक बँकेकडून आपल्या मोबाईल नंबरवरून ऑटोजनरेट होतील. आता चार अंकाच्या पिनला नवीन पिन मध्ये घालून सबमिट करायचे. मग तुम्ही नवीन पिनसोबत आपले एटीएम कार्ड वापरू शकता. आणि नवीन एटीएम कार्ड असेल तर ते सुरु होईल.

हे पण वाचा –

आता घर बसल्या Activate करा SBI चे नेट बँकिंग ! कसे ते जाणून घ्या

SBI, ICICI आणि HDFC बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणली आहे एक खास FD योजना, जाणून घ्या

सोन्या-चांदीच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या

१ लाख गुंतवून कमवू शकता ६० लाख रु, सुरु करा ‘या’ झाडाची शेती 

१५ जुलै पासून Yes Bank चे FPO, अर्ध्या किंमतीत शेअर खरेदी करण्याची उत्तम संधी

Leave a Comment