हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Home Loan : सध्या देशभरात सणासुदीचे वातावरण आहे. या सणासुदीच्या काळात सरकारी बँकेकडून ग्राहकांना होम लोनवरील व्याजदरात सूट दिली जाते आहे. आता ज्या ग्राहकांना नवीन घर खरेदी करायचे असेल त्यांना 31 जानेवारी 2023 पर्यंत या सवलतीचा लाभ घेता येईल. या ऑफरअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाकडून होम लोनवर 0.15% ते 0.30% पर्यंत सवलत मिळत आहे. SBI कडे सामान्य होम लोनचे व्याजदर 8.55% से 9.05%पर्यंत असतात.
SBI च्या फेस्टिव्ह कॅम्पेन ऑफर अंतर्गत 8.40% ते 9.05% पर्यंत परवडणारे व्याजदर दिले जात आहेत. SBI च्या नियमित आणि टॉप-अप होम लोनवर झिरो प्रोसेसिंग फी देखील दिली जात आहे. मात्र, सर्वात कमी दर आणि परवडणाऱ्या EMI चा लाभ घेण्यासाठी आपला CIBIL स्कोअर चांगला असणे देखील खूप महत्वाचे आहे. Home Loan
CIBIL स्कोअरच्या आधारे दिली जाणार सवलत
SBI च्या फेस्टिव्ह कॅम्पेनचा एक भाग म्हणून, बँकेकडून फ्लेक्स पे, अनिवासी भारतीय, पगारदार नसलेल्या नियमित होम लोनसाठी CIBIL स्कोअर किंवा 800 पेक्षा जास्त असलेल्या ग्राहकांना 8.40% व्याजदर दिला जात आहे. हे सामान्य दर 8.55% पेक्षा 0.15 टक्के कमी आहे. याशिवाय 750 ते 799 दरम्यान क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना 8.40% दराने होम लोन दिले जात आहे, जे नियमित 8.65% व्याजदरापेक्षा 0.25% कमी आहे. याशिवाय, 700 ते 749 वर CIBIL स्कोअर असलेल्या ग्राहकांना 0.20 टक्के सवलतीने होम लोन दिले जात आहे, जे नियमित 8.75% व्याजदरापेक्षा 8.55% आहे. Home Loan
या ग्राहकांना मिळणार नाही लाभ
हे लक्षात घ्या कि, 1 ते 699 च्या खाली क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना होम लोनच्या व्याजदरावर बँकेकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. तसेच 650-600 दरम्यान क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी होम लोनचे व्याजदर 8.85% ते 9.05% पर्यंत असतील. तसेच या फेस्टिव्ह कॅम्पेनसाठी, SBI ने त्याचा फ्लोअर रेट 15 बेसिस पॉईंटने कमी करून 8.55% च्या EBR वरून 8.40% केला आहे. Home Loan
प्रोसेसिंग फीवरही मिळणार सवलत
बँकेकडून चांगल्या क्रेडिट स्कोअर असलेल्यांना होम लोनवर 0.30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. SBI कडून या फेस्टिव्ह कॅम्पेनदरम्यान नियमित आणि टॉप-अप होम लोनवर झिरो प्रोसेसिंग चार्ज आकारला जात आहे. तसेच बँकेने या होम लोन साठी 10,000 रुपये फ्लॅट प्रोसेसिंग फी आणि जीएसटी आकारली जात आहे. याशिवाय SBI या कॅम्पेन अंतर्गत इतर कोणतीही सवलत दिली जाणार नाही. Home Loan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/loan-schemes-interest-rates/home-loans-interest-rates-current
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
‘या’ Multibagger Stock ने 700 टक्क्यांहून जास्त रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना केले मालामाल
WhatsApp चे नवे फीचर, आता लवकरच 1 हजारांहून जास्त लोकांना ग्रुपमध्ये Add करता येणार
Bajaj Finance ने FD व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा