हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण Bank locker वापरत असाल किंवा ते घेण्याचे प्लॅनिंग करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. कारण आजच्या या बातमीमध्ये आपण बँकेच्या लॉकरशी संबंधित सर्व माहिती जाणून घेउयात. तसेच याद्वारे आपल्याला कसा फायदा मिळू शकेल आणि त्याच्याशी संबंधित नियम काय आहेत जाणून घेउयात. मात्र, सर्वात आधी आपल्याकडे RBI कडून देण्यात आलेल्या लॉकर संबंधित नियमांची माहिती असणे महत्वाचे आहे.
हे लक्षात घ्या कि, नवीन वर्षाची सुरुवात होताच म्हणजेच 1 जानेवारी 2023 रोजी पासून RBI ने Bank locker शी संबंधित नियमात बदल केले आहेत. कारण आता हे नियम लागू झाल्यानंतर बँकांना लॉकरबाबत ग्राहकांशी आपली मनमानी करता येणार नाही. या नियमांतर्गत आता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या मालाचे खूप नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकेची असणार आहे. याशिवाय आता ग्राहकांना बँकेसोबत त्याबाबत करार करावा लागणार आहे. याबरोबरच आता बँकेला बँक लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती एसएमएस आणि इतर माध्यमातून ग्राहकांना द्यावी लागेल. चला तर मग जाणून या नियमांबाबत जाणून घेऊयात …
बँकेचे लॉकर कसे मिळवता येईल ???
यासाठी ग्राहकांना ज्या शाखेत लॉकर उघडायचे आहे तेथे अर्ज द्यावा लागेल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर Bank locker ची सुविधा देण्यात येते. तसेच जर आपले नाव वेटिंग लिस्टमध्ये असेल तर इतर ग्राहकाने लॉकर सोडल्यानंतर ते लोकर आपल्याला दिले जाईल. मात्र यासाठी आपल्या बँकेच्या खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागेल. कारण या खात्यातून वार्षिक भाडे आकारले जाईल.
किती शुल्क द्यावे लागेल ???
हे लक्षात घ्या कि, लॉकरचा आकार आणि स्थान यावर त्याचे वार्षिक शुल्क देखील निश्चित केले जाते.प्रत्येक बँकेनुसार ते वेगवेगळे असू शकते. जसे कि, SBI मध्ये Bank locker चे शुल्क 2 हजार ते 12 हजारांपर्यंत आहे. तर PNB कडून बँक लॉकरसाठी 1250 ते 10 हजार रुपये आकारले जाते. तसेच कॅनरा बँकेमध्ये हे शुल्क 2 हजार ते 10 हजारांपर्यंत असून एचडीएफसीमध्ये हे शुल्क 3 हजार ते 20 हजारांपर्यंत आहे. त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेमध्ये हे शुल्क 1200 रुपये आणि 5000 रुपयांपर्यंत आहे.
कोण-कोणत्या परिस्थितीत बँकेकडून भरपाई मिळेल ???
RBI च्या नवीन नियमांनुसार, लॉकरमध्ये ठेवलेल्या सामग्रीचे जर बँकेच्या निष्काळजीपणामुळे काही नुकसान झाले तर बँकेला त्याची भरपाई द्यावी लागेल. त्याच बरोबर ज्या जागेमध्ये सेफ डिपॉझिट व्हॉल्ट्स ठेवल्या जातात त्या जागेच्या सुरक्षेसाठी सर्व पावले उचलणे ही बँकांची जबाबदारी आहे. त्याच बरोबर बँकेच्या कर्मचार्यांनी केलेल्या फसवणुकीमुळे जर काही नुकसान झाले तर अशा परिस्थितीत बँकेचे दायित्व हे Bank locker च्या वार्षिक भाड्याच्या 100 पट पर्यंत असेल.
लोकरीच्या रिन्यूअलसाठी करार करावा लागेल
आता बँकेच्या लॉकर धारकांना नवीन लॉकर करारासाठी पात्रता दर्शवावी लागेल. तसेच 1 जानेवारी 2023 आधीच रिन्यूअलसाठीच करार करावा लागेल. ‘आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता नवीन लॉकर करार 31 डिसेंबर 2022 पूर्वी अंमलात आणायचा आहे.’
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=12146&Mode=0
हे पण वाचा :
Poco C50 : अवघ्या 6,499 रुपयांच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळवा जबरदस्त फीचर्स
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Indian Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या