Bank of Baroda कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank of Baroda : RBI ने 8 फेब्रुवारी रोजी रेपो दरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. ज्यानंतर बँकांनी आपले मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे. आता बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या बँकेकडून वेगवेगळ्या कालावधीच्या MCLR मध्ये 5 बेस पॉईंट म्हणजेच 0.05 टक्के वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे बँकेचे हे नवीन दर 12 फेब्रुवारी 2022 पासून लागू होतील.

Bank of Baroda sees loan growth of 7-10 pc in FY22 - The Economic Times

Bank of Baroda च्या म्हणण्यानुसार, 1 वर्षाचा MCLR वाढून 8.55 टक्के झाला आहे. त्याच वेळी, रात्रीचा MCLR 7.90%, एक महिन्याचा MCLR 8.20%, 3 महिन्यांचा MCLR 8.30% आणि 6 महिन्यांचा MCLR 8.40% इतका वाढवला आहे.

Bank of Baroda - Increase in Brand Value - Passionate In Marketing

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील. Bank Of Baroda

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. Bank of Baroda

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/hi-in/media/press-releases/bank-of-baroda-reduces-mclr-by-15-bps-deposit-rates-across-tenures

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे