बँकांवर दरोडे टाकणाऱ्या आंतरराजीय टोळीला जेरबंद करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सतेज औंधकर

दक्षिण भारतात बँकांना टार्गेट करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांना जेरबंद करण्यात यश आलं आहे. या टोळीतील चार आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गावठी बनावटीचे दोन कट्टे, 15 जिवंत काडतुसे, 93 हजार रुपयांची 10 आणि 5 रुपयांची नाणी,स्कार्पिओ असा 7 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी उत्तरप्रदेश मधील असून त्यांनी आंध्रप्रदेश,तामिळनाडू, बेळगाव येथील एसबीआय बँकेत दरोडा टाकला होता. तर कोल्हापुरातील कळे इथल्या बँकेतही दरोडा टाकला होता. या चोरीचा तपास सुरू असताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागलीय.बँक चोरीत कुख्यात असलेली ही टोळी बँकांची रेकी करून तेथील स्ट्रॉंग रुम्सना लक्ष करत होती. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

राजस्थानमधील मोस्ट वॉन्टेड बिष्णोई टोळीला कोल्हापूर पोलिसांनी केलं जेरबंद

दलितांच्या हत्या हे पण गुजरात माॅडेलच – नागनाथ कोतापल्ले

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती रतन टाटांसमोर नतमस्तक; सोशलमिडीयावर कौतुकाचा वर्षाव