हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Bank Strike : जर आपले या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करण्यास बँकेच्या शाखेत जाणार असाल तर आजची ही बातमी आपल्यसाठी उपयुक्त ठरेल. कारण या महिन्या अखेरीस बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे. बँक युनियन्स संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने या संप पुकारण्याची हाक दिली आहे. मुंबईत गुरुवारी झालेल्या UFBU च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या महिन्या अखेरीस सलग चार दिवस बँका बंद राहतील. कारण 28 जानेवारीला चौथा शनिवार आणि 29 जानेवारीला रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी असेल. तसेच 30 आणि 31 जानेवारी रोजी संपामुळे बँका बंद राहतील. यानंतर 1 फेब्रुवारीला बँका उघडतील. आता सलग 4 दिवस बँका बंद असल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. यादरम्यान एटीएममधील कॅश आणि चेक क्लिअरन्स सारख्या कामांसाठी वेळ लागू शकेल. Bank Strike
या संपामागील कारण जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, गेल्या अनेक दिवसांपासून बँकांच्या कर्मचाऱ्यांकडून काही मागण्या करण्यात येत आहेत. या मागण्यांच्या मान्यतेसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आता कर्मचारी दोन दिवस संपावर जाणार आहेत. याबाबत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की,”30 आणि 31 जानेवारी रोजी बँकेचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.” AIBEA ने पुढे सांगितले की,” त्यांनी आपल्या मागण्या इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ला पत्राद्वारे पाठवल्या आहेत. मात्र यावर बँक असोसिएशनकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. ज्यामुळे आता कर्मचाऱ्यांपुढे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर जाणे हाच मार्ग उरला आहे.” Bank Strike
बँक कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत ???
AIBEA चे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सांगितले की, बँक कर्मचाऱ्यांच्या मुख्यतः 5 मागण्या आहेत. बँकिंगचे काम 5 दिवसांचे करावे, यासोबतच पेन्शनही अपडेट करावी तसेच NPS रद्द करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्याचबरोबर पगारवाढीबाबतही चर्चा व्हायला हवी. याशिवाय सर्व संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी देखील बँकेच्या संघटनांकडून करण्यात आली आहे. Bank Strike
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://aibea.in/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
IDBI Bank ने ग्राहकांना दिला झटका, आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार