धक्कादायक ! क्रिकेटच्या वादातून डोक्यात बॅट घालून पंधरा वर्षीय मुलाची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चिपळूण : हॅलो महाराष्ट्र – चिपळूण तालुक्यातील सती येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राच्या डोक्यात बॅट घातली. यामध्ये तो मुलगा गंभीर जखमी झाला. या जखमी मुलाचे नाव लहुकुमार अनुपकुमार वर्मा असे आहे. हि घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती.

जखमी लहुकुमार अनुपकुमार वर्मा याच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आठ दिवसांच्या संघर्षानंतर बुधवारी लहुकुमारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत लहुकुमारची आई संगीता अनुपकुमार वर्मा यांनी अल्पवयीन मुलांच्या विरोधात चिपळूण पोलिसांत तक्रार दाखल केली.

वर्मा कुटुंबियांचा एकुलता एक ऐन उमेदीला मुलगा गेल्याने वर्मा कुटुंबियांवर मोठा डोंगर कोसळला आहे. यादरम्यान मृत लहुकुमारचा मृतदेह गुरुवारी घरी आणला असता ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने मृत लहुकुमारच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. यानंतर पोलिसांनी लहुकुमारच्या कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Leave a Comment