हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील संतकबीर नगर येथे एका विवाह सोहळ्यात एकच खळबळ उडाली जेव्हा एका युवती पोलिसांसह लग्नमंडपात पोहोचली. या युवतीचे म्हणणे ऐकून सगळेजण एकदम स्तब्धच झाले. या मंडपात असलेली वधूही एकदम थबकून गेली. यावेळी पोलिसांसमवेत पोहोचलेल्या या महिलेने रडत रडतच आपली व्यथा मांडली, त्यानंतर वधू आणि तिच्या कुटुंबियांनी हे लग्न करण्यास नकार दिला. यानंतर लग्नाची वरात परत आली. या परिसरात हा एक चर्चेचा विषय झाला .
प्रियकराने केली फसवणूक; दुसऱ्या मुलीचीही करणार होता फसवणुक
धानघाटा पोलिस स्टेशन परिसरातील दिहवा गावची रहिवासी असलेल्या या मुलीचे गेल्या काही वर्षांपासून तिच्या गावातील इमादुल्ला नावाच्या युवकाशी प्रेमसंबंध होते. यातील पहिल्या महिलेचे सुमारे तीन वर्षांपूर्वीच लग्न झालेले होते, पण प्रियकर इमादुल्लाहमुळे तिचे लग्न मोडले. तिच्या नवऱ्याने त्या महिलेबरोबरचे आपले संबंध संपवले. यानंतर या महिलेचे पुन्हा इमादुल्लाबरोबर प्रेमसंबंध सुरू झाले. यानंतर या दोघांनीही एकमेकांसोबत एकत्र राहण्याचे वचन दिले. दरम्यान इमादुल्लाचे सोनहन गावातील एका मुलीशी लग्न ठरले होते. लग्नाच्या दिवशी तो वरात घेऊन मुलीच्या घरी पोहोचला. लग्नाचा हा सोहळा अजून सुरूच व्हायचा होता, तेव्हाच पोलिसांसह त्याची मैत्रीण लग्नाच्या ठिकाणी पोहोचली.
‘लग्नाचे वचन मला दिले आणि लग्न दुसऱ्या कोणाबरोबर’
गेल्या अनेक वर्षांपासून या युवकाशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे या महिलेने सांगितले. तसेच तरूणाने तिच्याशी लग्न करण्याचे तिला वचनही दिलेले होते, पण तो लग्न मात्र दुसर्याच मुलीशी लग्न करीत आहे. त्या महिलेचे हे बोलणे ऐकून लग्न मंडपातील सगळेजण थक्कच झाले. यावेळी वधूच्या वडिलांनी आपल्या मुलीचा या मुलाबरोबर लग्न लावून देण्यास नकार दिला. यानंतर वराला आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. लग्न मोडल्यानंतर पंचायत बसली. मुलींकडच्यांनी मुलाकडे लग्नासाठी खर्च केलेल्या पैशांची मागणी केली, त्यावर मुलाने मुलीला २ लाख ६७ हजार रुपयांचा धनादेश दिला. यानंतर वरात परत आली. ही घटना या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय राहिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.