व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Ben Stokes चा महाविक्रम! अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) संघात पुनरागमन झाल्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत बेन स्टोक्सने (Ben Stokes) आपल्या दमदार खेळीने कमाल केली आहे. या मालिकेत बेन स्टोक्सने (Ben Stokes) एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. यामध्ये स्टोक्सने (Ben Stokes) कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक करून हा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सने हा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.

बेन स्टोक्सने (Ben Stokes) कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक ठोकले. त्याच्या अगोदर ब्रेंडन मॅक्क्युलम आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट या दोन खेळाडूंनी हा विक्रम केला आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक षटकार ठोकणारे क्रिकेटविश्वात केवळ तीन खेळाडू आहेत. बेन स्टोक्सने (Ben Stokes) हा विक्रम केवळ 82 व्या कसोटी सामन्यात केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार असणाऱ्या ब्रेंडन मॅक्युलम यांना मागे टाकण्यासाठी बेन स्टोक्सला अजून 8 षटकारांची गरज आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार
ब्रेंडन मॅक्युलम – 107 षटकार
अ‍ॅडम गिलख्रिस्ट – 100 षटकार
बेन स्टोक्स – 100 षटकार
ख्रिस गेल – 98 षटकार
जॅक कॅलिस – 97 षटकार

हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं

हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन

मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू