हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jan Dhan Account : केंद्र सरकारकडून देशातील लोकांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) ही देखील त्यापैकीच एक योजना आहे. या अंतर्गत झिरो बॅलन्समध्ये बँकेमध्ये खाते उघडता आहेत. यामध्ये अपघाती विमा, ओव्हरड्राफ्टची सुविधा, चेकबुक सारख्या अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. या योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती अनेक लोकांना नसते. आपल्याला हे खाते बँकिंग, बचत, कर्ज, विमा, पेन्शन यासाठी वापरता येईल. Jan Dhan Account
खात्यामध्ये पैसे नसतानाही काढता येतील 10 हजार रुपये
जन धन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यामध्ये पैसे नसले तरी 10,000 रुपये काढता येतील. याआधी ही लिमिट 5,000 रुपये होती. मात्र सरकारने आता ती वाढवून 10,000 रुपये केली आहे. Jan Dhan Account
यासाठीचे नियम जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, या खात्यामध्ये ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळविण्यासाठीची वयोमर्यादा 65 वर्षे आहे. मात्र, ही ओव्हरड्राफ्टची सुविधा आपले जन धन खाते 6 महिन्यांचे झाल्यानंतरच घेता येईल. मात्र यावेळी फक्त 2,000 रुपये काढता येतील. Jan Dhan Account
अशा प्रकारे उघडा खाते
हे लक्षात घ्या कि, जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये खाते उघडता येते. जर आपल्याला हवे असेल तर खाजगी बँकेतही खाते उघडता येईल. तसेच, जर आपल्याकडे आधीच बचत खाते असेल तर ते जन धन खात्यामध्ये रूपांतरित करता येईल. 10 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या कोणत्याही भारतीय नागरिकाला जन धन खाते उघडता येईल. Jan Dhan Account
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://pmjdy.gov.in/
हे पण वाचा :
Car कंपन्यांकडून कार खरेदीवर दिली जाते आहे लाखो रुपयांची सवलत, जाणून घ्या यामागील कारणे
Business Idea : हमखास कमाई मिळवून देणार ‘हा’ व्यवसाय, कसा सुरू करावा ते जाणून घ्या
BSNL च्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनमध्ये डेटासोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग
Bank Holidays : जानेवारीमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद, इथे पहा लिस्ट
Jio कडून नवीन वर्षासाठी धमाकेदार रिचार्ज प्लॅन लाँच, जाणून घ्या अधिक तपशील