हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Zero Balance Savings Accounts : सध्याच्या काळात बँकेमध्ये बचत खाते नाही अशी व्यक्ती क्वचितच आढळून येते. हे लक्षात घ्या कि, बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणारी ही एक प्रकारची सुविधाच आहे, ज्याअंतर्गत लोकांना आपल्या कमाईचे पैसे बँकेमध्ये जमा करता येतात. मात्र सहसा बचत खाते उघडण्यासाठी किमान रक्कम जमा करावी लागते. याबरोबरच या खात्यामध्ये किमान रक्कम कायम देखील ठेवावी लागते. मात्र तसे न केल्यास बँकेकडून दंड आकारला जाऊ शकेल.
हे जाणून घ्या कि, आपल्याला बँकेमध्ये शून्य शिल्लक बचत खाते म्हणजेच Zero Balance Savings Accounts देखील उघडता येते. देशातील अनेक बँकांकडून ग्राहकांना झिरो बॅलन्स बचत खात्याची सुविधा दिली जाते. याची खास बाब अशी कि, यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नसते. यासोबतच बँकेकडून अनेक प्रकारच्या बँकिंग सुविधा देखील अगदी मोफत दिल्या जातात. चला तर मग झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाऊंट कसे उघडावे आणि त्यामध्ये कोण-कोणत्या सुविधा दिल्या जातात याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात…
झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाऊंटचे फायदे जाणून घ्या
कोणत्याही बँकेमध्ये Zero Balance Savings Accounts उघडता येते. याचा सर्वात मोठा फायदा असा कि, या प्रकारच्या खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम राखण्याची कोणतीही सक्ती केली जात नाही. याशिवाय, या खात्याच्या मदतीने नेटबँकिंगद्वारे अगदी सहजपणे पैसे ट्रान्सफर करता येतात. यामध्ये खातेदाराला बँकेचे पासबुक, बेसिक रुपे एटीएम-कम-डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग सुविधा देखील मोफत दिल्या जातात.
अशा प्रकारे उघडता येईल Zero Balance Savings Accounts
हे जाणून घ्या कि, कोणत्याही व्यक्तीला झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाऊंट उघडता येते. देशातील बहुतेक बँकांमध्ये हे खाते ऑनलाइन उघडण्याची सुविधा दिली जाते. मात्र यासाठी व्हिडिओ केवायसी करावे लागेल. यासाठी आधार कार्ड आणि पॅन नंबरची माहिती द्यावी लागेल. तसेच ज्या बँकेमध्ये हे खाते उघडायचे आहे त्या बँकेच्या वेबसाइटवर याची माहिती मिळेल.
‘या’ खात्याच्या मर्यादा जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाऊंटचे फायदे असले तरी त्यासाठी काही मर्यादा देखील आहेत. या प्रकारच्या खात्यामध्ये ग्राहकांना एका वर्षामध्ये फक्त 1 लाख रुपयेच जमा करण्याची परवानगी दिली जाते. तसेच यापेक्षा जास्तीची रक्कम जमा करण्यासाठी हे खाते सामान्य बचत खात्यामध्ये रूपांतरित करावे लागेल. त्याचप्रमाणे, या खात्यामध्ये एका महिन्यात जास्तीत जास्त ट्रान्सझॅक्शन करण्यासाठी देखील मर्यादा असेल. तसेच यापेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन केल्यास, बँकेकडून आपले झिरो बॅलन्स अकाऊंट नियमित प्रकारच्या बचत खात्यामध्ये रूपांतरित केले जाईल. याशिवाय, Zero Balance Savings Accounts द्वारे एफडी, आरडीमध्ये गुंतवणूक करण्याचा आणि डीमॅट खाते उघडण्याचा पर्याय देखील मिळत नाही.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/personal-banking/accounts/zero-balance-savings-account
हे पण वाचा :
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट
Car च्या डिक्कीत ठेवा ‘हे’ Device; पंक्चर टायर एका मिनिटांत होईल ठीक
‘या’ Penny Stock ने गेल्या 20 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या भांडवलात केली 150 पटींनी वाढ