Friday, January 27, 2023

शिंदें गटाच्या आमदाराला देवीच्या दर्शनापासून रोखल्यामुळे कार्यकर्ते-भाविकांमध्ये बाचाबाची

- Advertisement -

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – सध्या हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथे मसाई देवीची यात्रा सुरू आहे. यादरम्यान हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांना गावकऱ्यांनी यात्रेमध्ये देवीचं दर्शन घेण्यापासून रोखले. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी आले होते, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना थांबवले.

गावातील यात्रेत कोणत्याही पक्षाचे आमदार, खासदार, नेते येण्याची प्रथा नसल्याचे कारण देऊन गावकऱ्यांनी आमदार बांगर यांना अडवलं. यानंतर गावकरी आणि आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी आमदार बांगर यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

- Advertisement -

यानंतर बांगर (Santosh Bangar) यांचे समर्थक आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि बघता बघता त्या ठिकाणी मोठी गर्दी निर्माण झाली. यानंतर गावकऱ्यांनी सामोपचाराने आमदार संतोष बांगर यांना यात्रेत दर्शन घ्यायला जाऊ दिले. तसेच यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. मी देवीच्या यात्रेत जाऊन दर्शन घेतले, मला गावकऱ्यांनी रोखलं नाही. काही चार-पाच उनाड लोकांनी विनाकारण गोंधळ घातला अशी प्रतिक्रिया आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती