Mumbai News : मुंबईकरांसाठी खुशखबर; बाप्पाच्या दर्शनासाठी 9 दिवस रात्रभर सुरु राहणार बेस्ट बस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेश उत्सव म्हणलं की, 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढोल, ताश्यांच्या गजरात गणरायाचे आगमन केले जाते. ह्याचा आनंद घेण्यासाठी गावागावातुन लोक येत असतात. मुंबईसारख्या मोठ्या शहरात सुद्धा अत्यंत उत्सहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. याच मुंबईकरांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचे दर्शन घेता यावे यासाठी  बेस्टने (BEST BUS)  रात्रभर बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणरायाचे दर्शन घेत असताना प्रवासाची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही

24 तास सुरु असेल बेस्ट

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणातील गणेशाचे दर्शन घेता घेता यावे यासाठी बेस्टकडून  नियमित सोडल्या जाणाऱ्या गाड्यांपेक्षा 20 ते 28 गाड्या रात्रभर जास्तीच्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकर ह्यावेळस गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहेत. गणेशउत्सवाच्या काळात अनेकजण आपल्या गावी जातात त्यांच्यासाठी  बेस्ट बस 24 तास सुरु असणार आहेत. त्यामुळे मुंबईकर ह्यावेळी गणेरायाची 24 तास सेवा करू शकणार आहेत.

कुठे – कुठे सोडल्या जातील गाड्या?

19 ते 27 सप्टेंबर या कालावधीत बेस्ट रात्रभर चालणार आहेत. या विशेष बसेसमध्ये उत्तर – पश्चिम मुंबई गिरगाव, परळ, लालबाग, चेंबूर, सीएसएमटी ते सायन, वरळी ते काळाचौकी, नागपाडा ते ओशिवरा, शिवरी ते दिंडोशी, पायधोनी ते विक्रोळी, नागपाडा ते नागपाडा यासह विविध मार्गांचा समावेश असेल. शिवाजी नगर, म्युझियम ते देवनार, गिरगाव ते सँडहर्स्ट रोड स्टेशन आणि म्युझियम ते शिवरी. सणासुदीच्या काळात रात्री उशिरा जाणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर वाहतूक उपलब्ध करून देण्याचा बेस्टचा उद्देश आहे. उत्सवाच्या काळातील 10 दिवस ह्या गाड्या सोडल्या जातील. या बस रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंतसेवेत असतील

इतर सुविधांचाही असेल समावेश 

दरम्यान, NMMT ने बेलापूर आणि पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यान 32 विशेष बस सेवा सुरू केल्या आहेत. या उपक्रमाचा उद्देश उपनगरीय गाड्यांचा वापर करून रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांना मदत करणे हा आहे. समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी दोन ट्रॅक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक लागू केला आहे. 18 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या आणि 2 ऑक्टोबर रोजी समारोप होणाऱ्या ब्लॉकमध्ये पनवेल स्टेशन यार्डमध्ये रात्री 12:30 ते पहाटे 5:30 या वेळेत तीन ते चार तासांचा ब्लॉक समाविष्ट आहे.