हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंकला यामुळे अनेक परदेशी पर्यटनासाठी भारत निवडतात. तसेच भारतातील अनेक हौसी लोकांना फिरायला आवडत असल्यामुळे ते इतर देशात जाण्याऐवजी देशांतर्गतच फिरतात. या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता IRCTC च्या अंतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train) सुरु करण्यात आली आहे. देखो अपना देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाला चालना देण्यासाठी भारत सरकारने ही नवी ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत रेल्वे मंत्रालय देशाच्या विविध भागात भारत गौरव पर्यटक गाड्या चालवत आहे. असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कशी असेल ही ट्रेन? Bharat Gaurav Tourist Train
भारत गौरव पर्यटक ट्रेन (Bharat Gaurav Tourist Train) ही प्रवाश्यांना सोयीस्कर अशी असणार आहे. यामध्ये इकॉनॉमी, कम्फर्ट आणि डिलक्स पर्याय उपलब्ध असणार आहेत. याद्वारे पर्यटकास भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा दाखवला जाणार आहे. ही एक सर्वसमावेशक ट्रेन असून या ट्रेनचे तिकीट IRCTC च्या अँपवरून बुक करता येणार आहे. यासाठी काही पॅकेजेस देखील असणार आहेत. यामध्ये एकूण तीन पर्याय उपलब्ध असतील ज्यात इकॉनॉमी, आराम आणि डिलक्स पर्याय आहेत. तसेच त्यात ट्रेनचे भाडे, जेवण, मुक्काम आणि वाहतूक यांचाही समावेश असणार आहे.
कोणत्या ठिकाणाला दिली जाईल भेट?
आज म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघुन मुंबई, पुणे, सोलापूर, गुंटकल, रेनिगुंटा, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, कोचुवेली यांसारखी प्रतिष्ठित ठिकानाला भेट देऊन 25 नोव्हेंबरला CSMT पर्यंत परत येईल. त्यामुळे या प्रवासासाठी अनेक भारतीय उत्सुक आहेत.