हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Elon Musk : भारतात सतत वाढणाऱ्या इंधनांच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) ग्राहकांचा कल वाढतो आहे. या संधीचा फायदा घेत अनेक कंपन्यांकडून भारतीय बाजारपेठेसाठी आपल्या EV लाँच करत आहेत. हे पाहता भारतीय वाहन उत्पादकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. याचा अंदाज Ola चे संस्थापक भावीश अग्रवाल यांचे म्हणणे ऐकून येतो. कारण त्यांनी नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या Elon Musk ची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला आव्हान दिले आहे.
Tesla-BYD शी स्पर्धा करण्याची तयारी
एका मीडिया रिपोर्ट मधील माहितीनुसार Ola चे संस्थापक असलेल्या भाविश अग्रवाल यांनी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक वाहने बनवण्याच्या बाबतीत थेट Elon Musk यांनाच आव्हान दिले आहे. या रिपोर्ट्सनुसार, भाविशने ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून फक्त टेस्लाच नव्हे चीनी कंपनी BYD ला देखील मोठी टक्कर देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
37 वर्षीय उद्योगपती भाविश अग्रवाल सांगतात की,” सध्या सर्वात स्वस्त टेस्ला कारची किंमत $ 50,000 आहे. जी जगातील बहुतेक लोकांना खरेदी करणे परवडणार नाही. ज्यामुळे, आमच्याकडे $1,000 आणि $50,000 मधील भिन्न पर्यायांसह EV क्रांतीचे नेतृत्व करण्याची उत्तम संधी चालून आली आहे.” Elon Musk
ईव्ही मार्केटमध्ये वेगाने वाढ होईल
रिसर्च अँड मार्केट्सच्या मते, या दशकाच्या अखेर पर्यंत भारतातील इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केट $150 अब्ज पेक्षा जास्त होईल. म्हणजेच या बाजाराचा आकार सध्याच्या आकाराच्या 400 पटापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. भाविश अग्रवालने भारताचा ऑटोमोबाईल व्यवसाय, विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत वेगाने नवीन दिशेने नेण्यावर भर दिला आहे.
भविष्यात काहीतरी मोठे करण्याची तयारी
हे जाणून घ्या कि, वयाच्या 20 व्या वर्षी भावीश अग्रवाल यांनी Ola ची स्थापना केली. जी भारतातील सर्वात मोठी राइड-शेअरिंग कंपनी बनली आहे. यानंतर त्यांनी Ola चा स्तर इतका उंचावला की, Uber सारख्या दिग्गज कंपनीलाही त्यांनी जोरदार टक्कर दिली. त्याच बरोबर आगामी काळात Ola काहीतरी मोठे करण्याची तयारी करत असल्याच्या चर्चाही अनेक दिवसांपासून येत आहेत. Elon Musk
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://olaelectric.com/
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बोनससहीत मिळेल गॅरेंटेड रिटर्न
Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागले
Ola S1 Pro vs Honda Activa 6G : कोणती गाडी खरेदी करणे फायद्याचे? किंमत अन् फिचर्स तपासा
5 Rupees Note : 5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे नवीन दर पहा