BIG BREKING NEWS : राज्यात आठ दिवसाच्या लॉकडाऊनची शक्यता? मुख्यमंत्र्यांसोबत टास्क फोर्सची बैठक सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक सुरू झाली आहे. कोरोनाबाबतचा आढावा या बैठकीत घेतला जात आहे. लसीकरण आणि लॉकडॉऊनवर चर्चा बैठकीत केली जात आहे. डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडलं आहे.

ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीला डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय ओक, झहीर उडवाडिया लिलावती रुग्णालयाचे डॉ . नागांवकर, वोक्हार्ट रुग्णालयाचे केदार तोरस्कर , फोर्टीस रुग्णालयाचे डॉ.राहुल पंडित,लोकमान्य टिळक शिव रुग्णालयाचे डॉ . एन.डी. कर्णिक, पी . ए .के. रुग्णालयाचे डॉ . झहिर विरानी , केईएम रुग्णालयाचे डॉ . प्रविण बांगर, कस्तुरबा रुग्णालयाचे डॉ ओम श्रीवास्तव हे या टास्क फोर्समध्ये आहेत.

संध्याकाळी 5 वा. या बैठकीला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांशी चर्चा करीत सुरवातीला आठ दिवस लॉककडाऊन करू असे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

 

You might also like