हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता अद्याप राज्यातील महाविद्यालये सूरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. अद्याप विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. आता मुख्य सचिवांनी सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालये सुरु करण्यास सांगितले आहे.
मुख्य सचिवांनी पत्रात १ ऑगस्ट पासून महाविद्यालये ऑनलाईन सुरु करावीत असे म्हंटले आहे. प्रवेश प्रक्रिया देखील ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. दरम्यान प्रथम, द्वितिय वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. १ सप्टेंबर पासून प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम सुरु व्हावा अशा सूचनाही या पत्रात मुख्य सचिवांनी दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना कोरोना संक्रमणापासून वाचविण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी अद्याप देण्यात आली नाही मात्र ऑनलाईन वर्ग सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु होतील. महाविद्यालये प्रवेश ही ऑनलाईन पद्धतीनेच घेणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.