हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना नुकतेच दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफव राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे. हे पत्र राज्यपालांनी स्वीकारले असून त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे वळसे पाटील यांच्या गृहमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर अत्यंत महत्वाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी सीबीआनं 5 दिवसात पूर्ण करावी, असा निर्णय कोर्टान दिला.यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला. अनिल देशमुख यांनी त्यापूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांची सिल्वर ओक वर भेट घेतली. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेत राजीनामा दिला.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा अशी विनंती केली. तर, गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती केली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या कामागर आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार होता. महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. वळसे पाटील यांनी यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद देखील भूषवले होते. त्या अनुभवाचा फायदा महाविकासआघाडीला झाला होता. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आला आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा कारभार देण्यात येत असून त्यांच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे नुकतेच पत्र दिले आहे. उद्या दिलीप वळसे-पाटील तातडीने या खात्याची सूत्रे हाती घेणार आहेत. सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखाते काही काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहील, असे म्हटले जात होते. मात्र, गृहखात्यासारखे संवेदनशील आणि सामर्थ्यशाली खाते राष्ट्रवादी इतर कोणाच्याही ताब्यात द्यायला तयार नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून तातडीने अनिल देशमुख यांचा उत्तराधिकारी कोण, हे ठरवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. दुसरीकडे शरद पवार यांचे आणखी एक विश्वासू सहकारी हसन मुश्रीफ यांचे नावही गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा होती. त्यासाठी हसन मुश्रीफ तातडीने मुंबईला रवाना झाल्याचेही सांगितले जात होते. मात्र, आता त्यांचा विचार गृहमंत्री नव्हे तर कामगार मंत्रालयासाठी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. हे खाते पूर्वी दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे होते. तर दिलीप वळसे-पाटील यांच्याकडील उत्पादन शुल्क खात्याचा कारभार हा अजित पवार स्वीकारतील, अशी सूत्रांची माहिती आहे.