उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी- किरीट सोमय्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोप झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चिट दिली होती. मात्र न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहे. देशमुख यांना सौरक्षण दिल्यामुळे या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असे विधान किरीट सोमय्या यांनी आज औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत केला.या वेळी त्यांनी राज्यसरकार चा वसुली सरकार असा उल्लेख करत टीका केली.

100 कोटी रुपयांच्या प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख विरोधातील आरोपांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी असे आदेश आज दिले. या नंतर राजकीय घडामोडीना वेग आले आणि तडकाफडकी नैतिक जबाबदारी स्वीकारत देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. याच प्रशवभूमीवर औरणगाबद दौऱ्यावर असलेले भाजप चे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जहरी टीका करीत. अनिल देशमुख यांना क्लिन चिट देत त्यांचे संरक्षण करणाऱ्या शरद पवार आणि मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी.

सचिन वाझे गॅंग ची वसुली 2000 कोटी पेक्षा अधिक आहे. टी.आर.पी.घोटाळा, रिया प्रकरण, या सर्वांमधून 2000 कोटींचा घोटाळा झाला. या घोटाळ्याचा लाभार्थी कोण? एन.सी.पी.च्या खात्यात किती गेले असा सवाल किरीत सोमय्या यांनी उपस्थित करीत हे सरकार वसुली सरकार असून आता पर्यंत गेल्या 10 महिन्यात आम्ही जे जे घोटाळे पुरावे निशी काढले ते सर्व एक एक करून जात असल्याचे सोमय्या म्हणाले.तर सचिन वाझे यांची पुनर्नियुक्ती ही गैरकायदे नुसार झाली त्यांची फाईल हरवणे हास्यास्पद असल्याचे देखील ते म्हणाले.

You might also like