Thursday, March 30, 2023

मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा (HSC) निकाल उद्या १६ जुलै रोजी लागणार

- Advertisement -

मुंबई | दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या १६ जुलै रोजी लागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

उद्या दुपारी १ वाजता महाराष्ट्र बाॅर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्याना आपले निकालपत्रक पाहता येणार आहे. यासाठी http://www.hscresults.mkcl.org आणि http://www.maharashtraeducation.com या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

- Advertisement -

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.