हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचा आर्थिक फटका अन्य उद्योगांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध शिल्लक राहत आहे. त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज १० लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ४ ते ५ दिवसात हे दूध संकलन सुरु होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे २ महिने सरकारची ही दूध खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.
कोरोना प्रादुर्भावामुळे दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित १२ लाख लिटर दुधापैकी १० हजार लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दूधाचा दर १५ ते १७ रुपये प्रति लिटरपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळं शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा आर्थिक फटका बसत आहे. तेव्हा आर्थिक संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले १० लाख लिटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून शासन २५ रुपये प्रति लिटर दराने खेरदी करेल.
खरेदी केलेल्या दुधाची भूकटी करुन ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आधार व दिलासा मिळेल. यासाठी साधारणपणे २०० कोटी रुपये निधी लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!
धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न
जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन
तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका
कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी