उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! शिवसेनेच्या गटनेतेपदाबाबत विधिमंडळचा मोठा निर्णय

uddhav thackeray and eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिवसेना गटनेते पद रद्द करण्यात आलं आहे. तर सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिवालयचे शिवदर्शन साठ्ये यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच विधीमंडळ गटनेते आहेत, यावर विधिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. विधिमंडळ सचिवालयानं याला मान्यता दिली आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा विजयी
महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट यांच्यातील वादावर अभ्यास करून दिला मोठा निर्णय दिला आहे. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सुरू असलेल्या व्हिप वॅारमध्ये अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने शिवसेना विधिमंडळ गट नेते म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मान्यांत दिली आहे. तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्या पक्षातर्फे शिंदेवर मोठी कारवाई केली होती. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवलं होतं. त्यांच्याजागी आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर राज्य विधिमंडळाने देखील अजय चौधरी यांच्या गटनेते पदी अधिकृत नियुक्ती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येताच विधिमंडळाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा :
रत्नागिरीत गुहागरच्या समुद्रकिनारी स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात मोठी खळबळ

राज्यात सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका होणार, शरद पवारांनी दिले संकेत

शिवसेना बंडखोरांची मने वळविण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना अटक

‘जे झालं ते…’, आयपीएलमधील वादावर जडेजाने दिली ‘हि’ प्रतिक्रिया

‘माझं ते म्हणणं रेकॉर्डवरुन काढून टाकावे’, जयंत पाटलांची विधानसभेत विनंती