भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष; सत्ता आल्यास नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी बिहार विधानसभा निवडणूक निकालात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

सध्या भाजपचे उमेदवार 71 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपपेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या संयुक्त जनता दलाचे (जदयू) उमेदवार 52 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजप हा मोठा भाऊ होणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता ‘एनडीए’ची सत्ता आल्यास नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे वचन भाजप पाळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सध्याच्या आकडेवारीनुसार, एकूण 243 जागांपैकी 131 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर महागठबंधन अवघ्या 96 जागांवर पुढे आहे. त्यामुळे एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 जागा जिंकून बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापन करेल, असे चित्र तुर्तास दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला सध्या २३.१८ टक्के मिळाली मते, तर जेडीयूच्या पारड्यात आतापर्यंत पडले १३.४८ टक्के मते मिळाली आहेत.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment