युती बाबत मुख्यमंत्री म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून पुढील महिन्यात होणारी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री होणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप 162 आणि शिवसेना 126 जागावर निवडणूक लढणार असल्याच्या वृत्तांचे मात्र त्यांनी फेटाळून लावले. दोन्ही पक्ष आघाडी करून निवडणूक लढणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचनी आज सांगितले. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी एका टप्प्यात निवडणुका होत आहे. तर मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी होईल.

आम्ही सोबतच निवडणूक लढणार असून यात कुठलीही अनिश्चिंतता नाही. जागावाटपाबाबत बोलणी अजूनही सुरु असून याप्रकारच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असेही फडणवीस म्हणाले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीतर्फे आयोजित कॉन्क्लेव-2019 मध्ये ते बोलत होते. 288 जागांपैकी समान जागा लढण्याच्या शिवसेनेच्या हेतूबाबत मुख्यमंत्री म्हणाले, जागा वाटपाबाबतच्या व्यवस्थेसंदर्भात पत्रपरिषदेत औपचारिकपणे जाहिर करण्यात येईल. एका प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री म्हणाले, भाजप शिवसेना कुठलेही निर्देश देणार नाही तर सामोपचाराने हा प्रश्न सोडविण्यात येईल.