हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते अतुल भातखळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यातील ट्विटर वॉर चांगलंच रंगलं आहे. दरम्यान सत्तेत असताना बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता तुम्ही त्यांच्याकडं फक्त उद्धवजींचे वडील म्हणून पाहता? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भातखळकर याना सुनावलं होते. त्यावर अतुल भातखळकर यांनी पलटवार करत पुन्हा एकदा रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
राजकीय सोयीसाठी आयुष्यभर कोलांट्या मारणाऱ्या शरद पवार यांच्या नावाने भूमिका बदलण्याबाबत दुसऱ्यावर टीका करावी हे जरा अतीच नाही का? केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल. अशा शब्दात भातखळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.
राजकीय सोयीसाठी आयुष्यभर कोलांट्या मारणाऱ्या @PawarSpeaks यांच्या नावाने भूमिका बदलण्याबाबत दुसऱ्यावर टीका करावी हे जरा अतीच नाही का @RRPSpeaks ?
केवळ पवार आडनाव एवढंच आपलं कर्तृत्व आहे, हे पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवलेत तर बरं होईल.@TV9Marathi @mataonline
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 30, 2021
काय आहे प्रकरण
देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो आहे. पण देशात नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे प्राधान्य कशाला द्यावे याचा विचार करण्याची गरज आहे, असे रोहित पवार म्हणाले होते. त्यावर अतुल भातखलकर यांनी प्रत्युत्तर दिले होते.
मुख्यमंत्री 400 कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरत आहेत. त्यांना रोहित पवार यांनी लसीकरण महत्त्वाचे की काय हा प्रश्न विचारावा. आपल्या गृहमंत्र्याने फ़क्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे असे म्हणतात. ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी,” अशी टिप्पणी भातखळकर यांनी केली.
दरम्यान सत्तेत असताना बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता तुम्ही त्यांच्याकडं फक्त उद्धवजींचे वडील म्हणून पाहता? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भातखळकर याना सुनावलं होते.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.