पवारांची राजकीय विश्वासार्हता शून्य असल्याने वावड्या उठणारच; भाजपचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान या भेटीनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पवारांवर टीका केली आहे.

पंतप्रधान आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत झालेल्या भेटीकडे राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज नाही. पवारांची राजकीय विश्वासार्हता शून्य असल्याने तर्कवितर्क-वावड्या उठणारच. राज्यातील सरकार हे अंतर्विरोधातूनच पडेल आणि त्यानंतर सरकार स्थापनेसाठी भाजप सक्षम पर्याय देईल.’ अशा आशयाचे ट्वीट करत भातखळकर यांनी पवारांवर तोफ डागलीआहे.

दरम्यान, नागरी सहकारी बँकांचे अधिकार कमी करुन रिझर्व्ह बँकेला जादा अधिकार देण्यात आले आहेत. त्याबाबत पंतप्रधान मोदी आणि पवार यांच्यातील बैठकीत चर्चा झाली.’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोरोना संकटाच्या काळात ज्या अडचणी येत आहेत, त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. लसीच्या योग्य पुरवठ्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असेही ते म्हणाले.

Leave a Comment