हा तर पळपुट्यांचा रडीचा डाव ; निलंबनानंतर भातखळकर आक्रमक

Atul Bhatkhalkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात ठाकरे सरकार वर सातत्याने टीका करणाऱ्या अतुल भातखळकर यांचाही समावेश आहे. दरम्यान या कारवाई नंतर भातखळकर आक्रमक झाले असून हा तर पळपुट्यांचा रडीचा डाव अस म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

धक्काबुक्की आम्ही केली नसून शिवसेनेच्या आमदाराने केली अस भातखळकर म्हणाले. मी तर वर पण गेलो नव्हतो. पण मी रोज सरकारवर टीका करतो, मुख्यमंत्र्यांवर टीका करतो म्हणून खुन्नस काढायचा म्हणून त्यांनी हा मार्ग अवलंबला असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला.

ते पुढे म्हणाले, ओबीसी आरक्षणाकरिता त्यांनी उरलेल्या 106 आमदारांना जरी निलंबित केलं तरी भाजप ओबीसी आरक्षणाचा आपला लढा चालू ठेवेल. या सरकारचा हा ढोंगीपणा आहे तो आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न सातत्याने करेन असेही त्यांनी ठणकावून सांगितले.