ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा ; भाजपचे राऊतांना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला असून अनिल देशमुख यांच्या कार्यालयात आणि बंगल्यावर छापा टाकण्यात आला आहे. दरम्यान यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत कूच तो गडबड है अशी शंका उपस्थित केली होती.

दरम्यान, राऊतांच्या या शंकेला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कुछ कशाला ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा आहे. १०० कोटींच्या घपल्याचा खरा सूत्रधार जनतेसमोर येईलच थोडी कळ काढा.’ असा प्रहार भातखळकर यांनी केला आहे.

संजय राऊतांनी काय ट्विट केले –

कुछ तो गडबड है…मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते. अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय. आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही.दया..कुछ तो गडबड जरूर है. असे ट्विट संजय राऊत यांनी केले.

Leave a Comment