काँग्रेसच्या खिजगणतीतही नसलेल्या पृथ्वीबाबांना मोदी NPA वाटणे स्वाभाविक; भाजपची सडकून टीका

0
24
prithviraj chavan modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत आहे. कोरोना लढ्याचा सामना करण्यात केंद्राला अपयश आल्याचं म्हणत देशातील सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकार वर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींचा उल्लेख बिनकामाची मालमत्ता असा केला होता. यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पृथ्वीराज बाबांवर जहरी टीका केली आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणाले. UPAच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक ‘परफॉर्मन्स’ पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच”, असा टोला भातखळकर यांनी चव्हाणांना लगावलाय.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणले होते-

पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांचा एक फोटो ट्वीट केला होता. त्यावर देशातील सर्वात मोठे नॉन परफॉर्मिंग अॅसेट असं लिहिलेलं आहे. म्हणजे मोदी हे बिनकामाची मालमत्ता आहे अस ते म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here