हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं असून शिवसेना तोंडावर पडली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सचिन वाझे हे एक हुशार आणि सक्षम अधिकारी आहेत अस म्हणणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अचानक घूमजाव केलं आहे. सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील अस संजय राऊत यांनी म्हंटल.
दरम्यान यावरून भाजप नेते अतुल भातखलकर यांनी राऊतांच्या दोन्ही वक्तव्याचा आधार घेत जोरदार टोला लगावला आहे. अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं अस म्हणत भातखलकर यांनी राऊतांवर निशाणा साधला.
अवं दाजिबा,
गावात होईल शोभा,
हे वागणं बरं नव्हं pic.twitter.com/ODW2dCI7hy— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 29, 2021
नक्की काय म्हणाले संजय राऊत –
संजय राऊत म्हणाले की, जेव्हा सचिन वाझेंना परत पोलीस सेवेत घेतलं होतं, तेव्हाच काही वरीष्ठ नेत्यांशी बोलताना मी म्हणालो होतो की, त्यांच्यामुळे पुढे अडचणी निर्माण होतील. काही वरिष्ठ आणि प्रमुख नेत्यांशी बोलताना म्हणालो होतो की, या अधिकाऱ्याचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत पाहाता आपल्यापुढे अडचणी निर्माण करू शकतील. हे बोललो, ते नेतेही सांगतील. कोणताही अधिकारी वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. ज्या पद्धतीने हे प्रकरण घडलं, त्यावर कदाचित कुणाचं नियंत्रण राहिलं नसेल. यातून अनेक मंत्र्यांनाही धडा मिळाला असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page