राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झालंय – चंद्रकांत पाटलांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू झालं आहे. त्यामुळे राज्यात कुणालाच कुणाचा धाक उरला नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. भाजपच्या कार्यकारिणी बैठकीनंतर च्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राजकारणाचं गुन्हेगारीकरण सध्या सुरू आहे. मधल्या काळात आंदोलनं झाली. त्यामुळे सरकारमध्ये बदल झाले. त्यानंतर महाराष्ट्र स्थिर झाला. राज्यात कायद्याची भीती निर्माण झाली होती. राज्याचं गुन्हेगारीकरण झालं नव्हतं. मात्र आता जगात जे जे काही गुन्हे आहेत. ते गुन्हे राज्यातील कोणत्या ना कोणत्या मंत्र्याशी जोडले गेले आहेत, असं पाटील म्हणाले.

कॉन्स्टेबलला मारहाण असो, कुणाचा जावई ड्रग्ज कनेक्शमध्ये आहे, कुणाचं नाव दिशा सालियन बलात्कार आणि हत्याप्रकरणात आलंय, कुणाला पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला तर कुणाला लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये मुले होतात… ही यादी खूप मोठी आहे. महाराष्ट्रात असं सर्व सुरू आहे. कोणता ना कोणता गुन्हा मंत्र्याशी जोडला गेला आहे आणि या मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मंत्र्यांना प्रोटेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय नेतेच काहीही करतात तर आपण केलं तर काय बिघडलं अशी जनतेची मानसिकता होत आहे, असं ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’