धनंजय मुंडे प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिरास झाला – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी जी भूमिका घेतली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांनी नैतिकता पाळावी आणि सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा,”  अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

“शरद पवारांनी धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर आहेत, असे म्हटलं होते. शरद पवार कडक धोरण स्वीकारतात. त्यांनी 50 वर्षाच्या जीवनात आरोप झाल्यानंतर त्या व्यक्तीला पाठीशी घातले असे झाले नाही, पण पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेने भ्रमनिरास झाला, पवारांनी घुमजाव का केलं हे कळलं नाही, असं पाटील म्हणाले. भारतीय राजकारणात अशी घटना घडल्यानंतर राजीनामा देण्याची कृती झालेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

अशा प्रकारच्या चुका झाल्या तर राजीनामा देणं हेच चांगलं असतं. राजकारणात आतापर्यंत असंच झालं आहे, असं सांगतानाच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास सोमवारपासून तहसिल कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल. महिला मोर्चाकडून ही निदर्शने होतील. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने तहसीलदार आणि कलेक्टरला निवेदन देण्यात येईल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like