नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी आधी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतरच मी लस घेईन – प्रकाश आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज देशात सर्वत्र कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहे. दरम्यान, या लसीकरण मोहीमेवर अनेक राजकीय व्यक्तींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही लसीकरणाबाबत सवाल उपस्थित केलाय. आधी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतर मी लस घेईल असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस टोचल्यानंतरच मी लस टोचून घेईन, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. दरम्यान, कोरोना लसीकरणाबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका आणि प्रश्नांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे.

मोदी काय म्हणाले होते-

आपले शास्त्रज्ञांनी भारतीय बनावटीच्या दोन्ही लसीबाबत खात्री पटल्यानंतरच लसीच्या आपत्कालीन वापसाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जगभरातील 60 टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात. त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसही विश्वासार्ह आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी आवर्जुन सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like